डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हिताचा

टिळक रस्ता - नितीन थोरात लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून संजय आवटे, अभय कुलकर्णी, थोरात, राजश्री थोरात, योगेश दशरथ, सुकीर्त गुमास्ते.
टिळक रस्ता - नितीन थोरात लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून संजय आवटे, अभय कुलकर्णी, थोरात, राजश्री थोरात, योगेश दशरथ, सुकीर्त गुमास्ते.

पुणे - मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार आणि प्रचारासाठी डिजिटल तंत्रज्ञान हे उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे यापुढील काळात त्याचा वापर अधिकाधिक प्रमाणात करणे हिताचे होणार आहे, असे मत ‘डिजिटलविश्वातील जागतिक मराठी’ या विषयावरील परिसंवादात उमटले.

‘स्टोरीटेल’ने जागतिक मराठी दिनानिमित्त हा परिसंवाद आयोजित केला होता. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विनायक पाचलग, ‘स्टोरीटेल इंडिया’चे प्रमुख योगेश दशरथ, पत्रकार संजय आवटे आणि अभय कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे अमराठीकरण वेगाने होते आहे. मराठीबरोबर अन्य भाषा शिकणे चूक नाही. पण, मराठीला दुय्यम स्थान दिले जाऊ नये. मराठी विद्यापीठ झाले, तर ज्ञानभाषेला मदत होणार आहे. ’’

आवटे म्हणाले, ‘‘डिजिटल माध्यमांमुळे अनेकांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे माध्यमात होणारे बदल स्वीकारले पाहिजेत.’’

योगेश दशरथ म्हणाले, ‘‘सध्या ऑडिओ आणि व्हिडिओचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि यापुढील काळात वाढीला संधी भरपूर प्रमाणावर असणार आहे. जागतिक स्तरावरील भाषेच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त असले, तरी वाचकांना मिळणारे संदर्भ गुणवत्तापूर्ण असावेत.’’ सुकीर्त गुमास्ते यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com