esakal | बारामतीकरांनो, मास्कविना फिरु नका; अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांनो, मास्कविना फिरु नका; अन्यथा...

- मास्कबाबत अजूनही अनेक जण बेफिकीर असल्याने चिंतेचे वातावरण.

बारामतीकरांनो, मास्कविना फिरु नका; अन्यथा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : लॉकडाऊननंतरचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बारामतीचे चक्र पुन्हा सुरु झाले खरे, मात्र मास्कबाबत अजूनही अनेक जण बेफिकीर असल्याने चिंतेचे वातावरण आहे. अनेक जण मास्कचा वापरच करत नाहीत, ज्यांच्या तोंडावर मास्क आहे ते मास्क खाली करुन मोबाईलवर बोलण्यासह समोरच्या व्यक्तीशी संभाषण करतात, अनेक विक्रेते बिनधास्त मास्कविना विक्री करतात तर काही कर्मचारी मास्कशिवाय वावरतात, असे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वाहन चालविण्याचा परवाना तपासण्यापेक्षाही विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे बनत चालले आहे. शहरात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व्यवहारास परवानगी दिलेली आहे. त्यानंतरही लोक शहरात बिनधास्त फिरत असतात, अनेकांच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल असतो पण अनेक जण विनामास्क व विनारुमाल बिनदिक्कतपणे फिरतात. कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्याचा धोका कायमच आहे आणि त्यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मास्कचा वापर अनिवार्यच...

चीनमधील वुहानमध्ये साथ असताना एक व्यक्ती त्याच्या गावी निघाली. बसमधून प्रवास करून एका ठिकाणी उतरुन त्याने पुढील प्रवास मिनीबसने केला. दोन दिवसांत त्याला ताप आला व कोरोनाचे निदान झाले. बस व मिनीबसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली असता, बसमधील पाच प्रवाशांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु मिनीबसमधील एकाही व्यक्तीला लागण झाली नाही. याचे कारण असे की त्याने बस प्रवासात मास्क लावला नाही. परंतु मिनीबसचा प्रवास मास्क लावून केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

साधारण 80 टक्के लोकांना कोरोना बाधा झाल्याचे लक्षणे नसल्याने लक्षात येत नाही. मात्र, हे इतरांना कोरोना संक्रमित करतात. यातही वयस्कर व्यक्तींचा तसेच इतर आजार असलेल्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य आहे. सर्व कामे करून घरी परत आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून मगच मास्क काढावा. मधल्या काळात मास्कला हात लावू नये. बोलताना, खोकताना, शिंकताना वा कोणत्याही कारणांमुळे मास्क काढू नये. मास्कने नाक व तोंड पूर्ण झाकलेले हवे. नाकाजवळ व हनुवटीजवळ गॅप नसावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

N 95 व सर्जिकल मास्क, डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी व रुग्णांनी वापरावे. सर्वसामान्य लोकांनी तीन पदरी कापडी मास्क लावावेत. दोन पदर कॉटन व मधला पदर शिफॉनचा असल्यास उत्तम. अगदी शक्य नसल्यास कापडी मास्क व वरून दोन पदरी रुमाल हा एक पर्याय आहे.

-  डॉ. हर्षवर्धन व्होरा, बारामती.