esakal | पुण्यात पत्नीसह मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पत्नीसह मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या

पुण्यात पत्नीसह मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर - पत्नी व एक वर्षे वयाच्या लहान मुलाचा खुन करुन, ट्रक चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे रविवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला आहे. हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय 38 वर्षे, रा. वाकवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली, मुळगाव, बक्षी हिप्परगा ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर) असे गळफास घेणाऱ्या ट्रक चालकाचे नाव आहे. हणुमंत याने आत्महत्या करण्यापुर्वी पत्नी प्रज्ञा (वय 28 वर्षे) हिचा गळा आवळुन तर लहान बाळ, शिवतेज याचा चाकुने गळ्यावर वार करुन खुन केल्याचे आढळुन आले आहे.

दरम्यान, हणुमंत शिंदे याचे वडील दर्याप्पा अर्जुण शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हनुमंत शिंदे याने केलेल्या कृत्याचे नेमके कारण पुढे आले नसले तरी, लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतुन हनुमंत शिंदे याने वरील पाऊल उचलले असल्याची शक्यता हनुमंत शिंदे याचे नातेवाईक व लोणी काळभोर पोलिसांनीही व्यक्त केली आहे. लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हणुमंत शिंदे हा ट्रक चालक असुन, मागील अडीच वर्षापासुन वाकवस्ती येथील श्रीधर काळभोर यांच्या खोलीत वडील दर्याप्पा, भाऊ सोमनाथ (वय- ३५), पत्नी प्रज्ञा, मोठा मुलगा प्रथमेश (वय- ७), मुलगी ईश्वरी (वय- ४) व लहान मुलगा शिवतेज याच्यासह भाड्याने राहत होता.

हेही वाचा: गुंडाने मुलीला पळविले, पोलिसांना कळविले; पण...

कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासून हणुमंत घऱीच होता. रविवारी सोमनाथ हा कामावर गेला होता तर हणुमंत हा वडील, पत्नी व तीन मुलांच्यासह घरीच होता. दर्याप्पा बाहेर गेले होते. ते दुपारी दोनच्या सुमारास घरी आले असता, हणुमंत, त्याची पत्नी प्रज्ञा व लहान मुलगा शिवतेज बेडरुमचे दार बंद करुन, बेडरुममध्ये झोपल्याचे दर्याप्पा यांना दिसुन आले. तर प्रथमेश, मुलगी ईश्वरी हे दोघेही हॉलमध्ये खेळत होते. मुलगा व सुन झोपली असतील म्हणुन दर्याप्पा यांनीही हणुमंतच्या बेडरुमकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान हणुमंत हा सायंकाळी सहा वाजलेनंतरही बेडरुम उघडत नसल्याचे पाहुन, दर्याप्पा, प्रथमेश व ईश्वरी यांनी दरवाजा उघडावा यासाठी हणुमंत व प्रज्ञा यांना आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र आतून कसलाही आवाज येत नसल्याने, दर्याप्पा यांनी रात्री आठच्या सुमारास हणुमंत यांच्या बहीणीला फोन करुन, हणुमंत दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. यावर ही बाब सोमनाथ यालाही कळवली. सोमनाथ व त्याच्या बहिणीने दहाच्या सुमारास येऊन, हणुमंत याच्या बेडरुमचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. मात्र कसलाच प्रतिसाद येत नसल्याचे लक्षात येताच, स्थानिक नागरीकांनी हणुमंत याच्या बेडरुची मागील खिडकी तोडली. खिडकीतून आत पाहिले असता, हणुमंत हा पंख्याला गळफास घेतल्याच्या अवस्थेत तर प्रज्ञा व शिवतेज निपचीत पडल्याचे आढळुन आले. ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक सतीश काळे, पोलिस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, जयंत हन्चाटे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले.

हेही वाचा: सोलापूरच्या वाट्याचं एक थेंबही पाणी घेणार नाही, पण...

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट

याबाबत अधिक माहीती देतांना राजेंद्र मोकाशी म्हणाले की,'हनुमंत शिंदे याचे वडील दर्याप्पा, यांनी दिलेल्या प्राथमिक तक्रारीनुसार पोलिसांनी हनुमंत याच्या विरुध्द आत्महत्या व पत्नी व मुलाचा खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दर्याप्पा, भाऊ सोमनाथ व हणुमंत याच्या काही नातेवाकांच्या बरोबर चर्चा केली असली तरी, हणुमंत शिंदे याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.