esakal | पुणे: लोककला सादर करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: लोककला सादर करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम

पुणे: लोककला सादर करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : लोककला सादर करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्याबाबत मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. या मागणीचा विचार करत पुणे महानगरपालिकेमार्फत लोककला सादर करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पुणे शहरातील पोवाडे, शाहिरीचे कार्यक्रम, देवीची गाणी, जागरण गोंधळ ते एकपात्री अनेक पात्र असे बहुरूपी सोंग घेऊन समाजाचे प्रबोधन करीत असलेल्या इत्यादी तसेच नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कला सादर करणाऱ्या विविध कलाकारांसाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील ५ व्या मजल्यावर स्थापित लसीकरण केंद्रावर दर आठवड्याच्या शुक्रवारी सकाळी १० ते ५ या वेळेत हि विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा: खुशखबर! चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग यशस्वी; ताणतणाव होतो कमी

तसेच ज्या कलाकारांना डोस घ्यावयाचा आहे त्यांनी काम करत असलेल्या संस्थेचे निगडीत ओळखपत्र, कलाकार स्वतः व्यक्तिगत कला सादर करत असल्यास त्याचे ओळखपत्र जवळ असणे आवश्यक राहील, तरी पुणे मनपा प्रशासनाकडून उपरोक्त नमूद केलेल्या विहित वेळी संबंधितानी लसीकरणासाठी उपरोक्त ठिकाणी उपस्थित रहावयाचे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी म्हटलंय.

loading image