esakal | आळंदीत लसीकरणासाठी वशिलेबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

आळंदीत लसीकरणासाठी वशिलेबाजी

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी - कोविशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) डोस घेण्यासाठी रांगेतील (Line) उभ्या नागरिकांना डावलून वैद्यकिय कर्मचारी, नगरसेवक तसेच पोलिसांच्या नातेवाईकांचीच (Relatives) घुसखोरीची रिघ आज दिसून आली. तासनतास रांगेतील नागरिकांना (Public) साधे बसायला जागा नाही, प्यायचे पाणी नाही आणि त्यातच वशिलेबाजी (Preferential) पाहून आळंदीकरांना (Alandi) डोस नको पण कुत्रं आवर असे म्हणायची विदारक परिस्थीती लसीकरण मोहिमेतील केंद्रावर (Vaccination Center) दिसते. (Vaccination in Alandi Preferential People)

गेले काही दिवस लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण मोहिम बंद होती. आज सकाळी दहा वाजल्यापासून आळंदी पालिकेच्या शाळेमधे लसीकरण मोहिम ग्रामीण रूग्णालय आणि पालिकेच्या मार्फत सुरू झाली. रांगेत अनेक महिला,पुरूष,वृद्ध गर्दी करून होते. आधिच अस्वच्छ परिसर त्यात बसायला निट जागा नाही.कुणी उभे राहून तर कुणी दोन पायावर बसून आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत उभे राहिले. जेमतेम मोजक्याच खुर्च्या त्यावरही धुळ पाहून लोक उभेच राहणे पसंद करत होते. तासनतास रांगेत उभे राहूनही राजकीय तसेच शासकिय कर्मचा-यांच्या पाहूण्याची वशिलेबाजीच नागरिकांना पाहायला मिळाली. मग रांगेतील लोक गोंधळ घालू लागले. तरीपण कुणी नर्सचे, तर कुणी नगरसेवकाचे,तर कुणी पोलिसांची पत्नी असल्याने वशिला लावून रांगेतील लोकांना डावलून लसीकरणासाठी पुढे होत होते.

हेही वाचा: कोरोनानंतरच्या बुरशीसाठी हवी ‘टास्क फोर्स’; म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ

वशिलेबाजीसाठी एक शिपाई नेमला होता. एवढे करून नंबर आलाच तर दुपारी जेवणासाठी म्हणून पुन्हा दार बंद झाले. अडीच वाजता जेवणानंतर पुन्हा लसीकरण सुरू होईल म्हणून शिपायाने जोराने दार बंद केले. मात्र लसीकरणासाठी आत बोलावलेल्या नागरिकांना तुम्हांला बाहेरच थांबा म्हणून सांगितले ना अशी त्या शिपायांची ओरड चालूच होती. एकंदर लसिकरण मोहिमेतील वशिलेबाजी आणि नागरिकांना मिळणारी वागणूक यामुळे रांगेतील नागरिक माझा नंबर कधी येतो आणि मी घरी जातो असे मनोमन प्रार्थना करताना दिसून येत होता. खास करून महिला आणि जेष्ठ नागरिकांची कुचंबणा होताना दिसून आली.

हेही वाचा: पोलिस आले रे! दीप बंगला चौकात अलर्ट देत दारु विक्री

लसीकरणातील वशिलेबाजी आणि येथील नेमलेला ठेक्यातील कर्मचा-यांची अरेरावीची भाषा पाहून नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर,नगरसेवक तुषार घुंडरे,मुख्याधिकारी अंकूश जाधव यांना नागरिकांनी तक्रार केली.यावर सदरच्या कर्मचा-यास काढून दुस-याची नेमणूक करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र वीस मिनीटांनी पुन्हा तोच कर्मचारी लसिकरण केंद्रावर पुन्हा काम करत होता. याच कर्मचा-याच्या विरोधात चार वर्षांपूर्वी पालिकेच्या तिजोरी फोडून पैसे चोरल्याची गुन्हाही आळंदी पोलिस ठाण्यात दाखल होता. मात्र गेली दोन महिन्यांपासून लसिकरण मोहिमेत वशिलेबाजीसाठी लुडबुड करायला नेमले की काय असा सवाल नागरिक विचारत आहे.

दरम्यान आज दिवसभरात एकशे एकोणसत्तर जणांचे लसिकरण झाले.आजपर्यंत तब्बल पाच हजार दोनशे पन्नास जणांचे लसिकरण झाल्याची माहिती ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गणपत जाधव यांनी दिली.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा