esakal | 'खासगी'सहित पुणे महापालिकेच्या ७० केंद्रांवर रविवारी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

'खासगी'सहित पुणे महापालिकेच्या ७० केंद्रांवर रविवारी लसीकरण

'खासगी'सहित पुणे महापालिकेच्या ७० केंद्रांवर रविवारी लसीकरण

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शासनाकडून महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचे १३ हजार डोस उपलब्ध झाले असून उद्या (रविवारी) महापालिकेच्या ७० केंद्रांवर ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण होणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांनी थेट कंपनीकडूनच लस खरेदी केलेली असल्याने तेथेही लसीकरण सुरू असेल.

हेही वाचा: आइन्स्टाइनने E=MC2 लिहलेल्या कागदाचा लिलाव; मिळाला छप्परतोड भाव

केंद्र शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला परवानगी दिली असली तरी, लस उपलब्ध नसल्याने सध्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेला मंगळवारी (ता. १८) कोव्हीशील्डचे फक्त साडे सात हजार व बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाले. त्यानंतर दोन दिवस लसीकरण झाले. त्यानंतर शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवार व शनिवारी महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद होती.

खासगी रुग्णालयांनी थेट सिरम कंपनीकडून लस खरेदी केली आहे. त्यामुळे तेथे शनिवारपासून लसीकरण सुरू झाले आहे. त्यातच आता महापालिकेला आज कोव्हीशील्डचे १३ हजार डोस मिळाले असून, ७० केंद्रांवर लस प्रत्येकी १०० डोस दिले आहेत.

असे होणार लसीकरण

- ऑनलाईन बुकींग करून पहिला डोस घेणार्या ४५ च्या पुढील नागरिकांसाठी ६० टक्के लस राखीव असेल

- आॅनलाईन बुकींग रविवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

- थेट लसीकरण केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी २० टक्के लस उपलब्ध असेल.

- ज्यांनी पहिला डोस २७ फेब्रुवारी (८४ दिवस) पूर्वी घेतला आहे, अशा ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के लस राखीव आहे.

loading image
go to top