esakal | लशीचे शुल्क सर्व ठिकाणी सारखेच आकारावे; महापालिकेची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लशीचे शुल्क सर्व ठिकाणी सारखेच आकारावे; महापालिकेची भूमिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - खासगी रुग्णालयांतील (Private Hospital) लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) एका डोससाठी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत शुल्क (Fee) आकारले जात आहे. या शुल्कात समानता असावी, अशी मागणी महापालिका प्रशासन (Municipal Administrative) राज्य शासनाकडे (State Government) करणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार (Vikramkumar) यांनी सांगितले. दरम्यान, ९०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. (Vaccination Rate Same in all Places Municpal)

शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. रुग्णालयांत लशीसह चहा, पाणी, नाष्टा अशा सुविधाही दिल्या जातात. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था देखील केली जाते. या सुविधांमुळे पैसे देखील जास्त घेतले जात आहेत. मात्र, शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये लसीकरण शुल्क सारखे दर असावेत, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विक्रम कुमार म्हणाले, ‘‘खासगी लसीकरण केंद्रांवरील शुल्क एकसमान असले पाहिजे. यासाठी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.’’

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच

नऊशेपेक्षा जास्त रक्कम घेतल्यास कारवाई

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांनी ९०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रमाणे इतर रुग्णालयांनी दुर्बल घटकांना लसीकरणात सवलत देण्याची तयारी दाखवली पाहिजे.’

खासगी रुग्णालयांत होणाऱ्या लसीकरणामुळे शहराला मदत होत आहे. परंतु, प्रत्येक केंद्रांवर भिन्न शुल्क असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सर्व खासगी केंद्रांवर दर समान असावेत.

- मुरलीधर मोहोळ, महापौर