esakal | Pune : थेट महाविद्यालयात होणार लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

college vaccination

Pune : थेट महाविद्यालयात होणार लसीकरण

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरातील महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा तपशील लवकर जाहीर केला जाणार आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या बैठकीत दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अनेक विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयातील कर्मचारी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लसीकरण महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे २०० लसीकरण केंद्र असले तरी आता त्यात काही महाविद्यालयांची भर पडणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लसीकरण न झालेले नाही त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या विशेष मोहीमचे लवकरच नियोजन जाहीर केले जाईल

loading image
go to top