
पुणे : ‘लसीकरण’ हा शब्द मुलांसोबत जोडला जातो; परंतु लहानपणी केलेल्या लसीकरणाची प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकतेच असेही नाही. त्यामुळे मोठ्यांचे शरीरही हे आजारांना बळी पडते. म्हणून लसीकरण फक्त मुलांसाठीच नाही तर ४५ वयानंतरच्या प्रौढांसाठीही असून त्यांच्यामध्येही लसीकरण करून घेण्याचा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे संसर्गरोगतज्ज्ञ सांगतात.