esakal | दिलासादायक! पुण्यात आजपासून सर्वांना सर्व केंद्रांवर मिळणार लस
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield Vaccine

दिलासादायक! पुण्यात आजपासून सर्वांना सर्व केंद्रांवर मिळणार लस

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - शहरात १८ ते ४४ वयोगटासाठी आणि ४५ च्या पुढील वयोगटासाठी केंद्र कोणते याची नागरिकांना शोधाशोध करावी लागत होती. मात्र, महापालिकेने (Municipal) नवे नियम जाहीर केले असून, लसीकरणासाठी (Vaccination) पात्र असलेल्या नागरिकांना कोणत्याही केंद्रावर जाऊन लस (Dose) घेता येणार आहे. उद्या (ता. ६) शहरात १९७ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. ऑनलाइन बुकींग सकाळी ८ वाजता सुरू होईल. (Vaccines will be Available at All Centers in Pune from Today)

केंद्र सरकारकडून महापालिकेला आज (सोमवारी) कोव्हीशील्ड लसीचे ३२ हजार डोस मिळाले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस शिल्लक आहेत. मंगळवारी १९१ ठिकाणी कोव्हीशील्ड तर ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनची लस उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा: घरगड्यापेक्षा कमी पगार; विनाअनुदानित प्राध्यापकांची वेठबिगारी

शहरात कोव्हीशील्ड लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटासाठी ५८ केंद्र आणि ४५ ते पुढील गटासाठी ११५ ते १२१ स्वतंत्र केंद्र होते. नागरिकांना आपल्या वयोगटाचे घराजवळील केंद्र कोणते आहे हे शोधावे लागत होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांकडून माझ्या प्रभागात तरुणांचे आणि ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करा अशी मागणी प्रशासनाकडे केली जात होती. परंतु, तशी परवानगी केंद्र शासनाकडून मिळत नसल्याने हा निर्णय घेतला जात नव्हता.

केंद्र शासनाकडून लसीकरणाचे नवे नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये १८ च्या पुढील सर्व नागरिकांना कोणत्याही केंद्रांवर लसीकरण करता येईल असे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने नियोजन जाहीर केले आहे. मात्र, नागरिकांना शहरात कुठेही लस घेता येणार असली तरी तरुण, ज्येष्ठ नागरिक एकाच केंद्रावर येणार असल्याचे गर्दी झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ''मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते; पण...''

असे होईल लसीकरण

कोव्हीशील्ड

- १९१ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (६ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस आॅनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- ७ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image