

खेडच्या 'वाडा' परिसरात आरोग्याचा जागर! ५६५ नागरिकांनी घेतला मोफत शिबिराचा लाभ; स्तनाचा कर्करोग ते आयुष्मान भारत नोंदणीपर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली
Sakal
चास : ग्रामीण भागातील जनता आरोग्याकडे दूर्लक्ष करते त्यामुळे आजार बळावत जातो व पर्यायाने भविष्यात गंभीर आजारांना सामोरे जावे लागते यासाठी ग्रामीण भागात आरोग्य शिबीरे गरजेची असून वाडा व परिसर हा रोगमुक्त कसा राहील या साठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजप सहकार आघाडी उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर शेटे यांनी वाडा (ता.खेड ) येथे व्यक्त केले.