
पुणे : वडगाव खुर्दमधील महापालिकेच्या लायगुडे दवाखान्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दवाखान्याच्या परिसरात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे डेंगी, मलेरिया यासारख्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.