

Pune District Crime Woman Targeted During Early Morning Walk Gold Jewellery Worth 95000 Rupees Snatched by Three Men
esakal
वडगाव निंबाळकर: पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे टॉप्स मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना वडगाव निंबाळकर येथे रविवारी (ता. १) सकाळी घडली. या घटनेत सुमारे ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.