Ambegaon Road: वडगावपीर–मांदळेवाडी रस्ता चार महिन्यातच उखडला; खड्डे, खचलेला मार्ग पाहणी करून ठेकेदाराला नोटीस

वडगावपीर–मांदळेवाडी रस्त्याचे लाखो रुपयांचे डांबरीकरण अवघ्या तीन–चार महिन्यात उखडून खड्डेमय; ग्रामस्थ संतप्त, प्रवास धोकादायक
Vadgaon Peer–Mandlewadi Road: The newly tarred road developed potholes and damaged patches within three to four months, with asphalt peeling off and gravel surfacing.

Vadgaon Peer–Mandlewadi Road: The newly tarred road developed potholes and damaged patches within three to four months, with asphalt peeling off and gravel surfacing.

Sakal

Updated on

पारगाव : वडगावपीर ता. आंबेगाव ते मांदळेवाडी रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यातच वाट लागली असून जागोजागी डांबर उखडून खडी वर आल्याने खड्डे पडले आहे. तर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. प्रशासनाच्या बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मांदळेवाडी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष विजय आदक यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com