

Devotees offering flowers at the memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj at Vadhu Budruk.
Sakal
शिक्रापूर : अभिवादन दिनाच्या निमित्ताने पेरणे फाटा (ता.हवेली) येथे आलेले हजारो भाविक वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळावर नतमस्तक झाले. अर्थात जवळच असलेल्या गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाचेही दर्शन या भाविकांनी घेतले. दरवर्षीच्या तुलनेत मात्र यावर्षी भाविकांची संख्या जवळपास निम्मी एवढी राहिल्याचे चित्र राहिले असून प्रशासकीय पातळीवर मात्र पूर्ण चोख व्यवस्था राबविली गेली.