अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांचे आज रुग्णालयातून उपचार पूर्ण करून तालुक्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी उत्स्फूर्त स्वागत क.

अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांचे आज रुग्णालयातून उपचार पूर्ण करून तालुक्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी उत्स्फूर्त स्वागत क.
Published on

वैभव पिचड यांचे
उत्स्फूर्त स्वागत
अकोले, ता. २२ : तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांचे रुग्णालयातून उपचार पूर्ण करून तालुक्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी उत्स्फूर्त स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राजूर येथील निवासस्थानी माजी सरपंच गणपत देशमुख, प्रभारी सरपंच संतोष बनसोडे, गोकूळ कानकाटे, तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी पिचड यांचे स्वागत केले. त्यानंतर अमृतसागर दूध संघ व भाजप कार्यालयात आयोजित स्वागत समारंभात अप्पा आवारी, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सुनील दातीर, सुधाकर देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सीताराम भांगरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com