Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम देवळे येथील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलात निवड; तीनही भावंडे महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल होऊन आदिवासी भागासाठी प्रेरणादायी उदाहरण
Determination Overcomes Geographical Barriers

Determination Overcomes Geographical Barriers

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम आदिवासी भागातील देवळे येथील वैशाली वाल्हू शेळके हिची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरतीच्या निकालात पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलात वैशाली हिची निवड झाली आहे. तर महाराष्ट्र पोलिस दलात शेळके यांच्या कुटुंबातील दोन मुली व एक मुलगा असे तीनही जण पोलिस भरती झाल्याबद्दल शेळके कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com