
वैष्णवी हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या हगवणे कुटुंबातील पाच जणांच्या पोलीस कोठडीत आज वाढ करण्यात आली. सासू, पती आणि नणंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर सासरा आणि दीर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी हगवणेंच्या वकिलांनी अनेक आरोप करत वैष्णवीचं चारित्र्यहनन केलं. ती नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती आणि त्याच कारणातून तिने आत्महत्या केली असावी असा दावा हगवणेंच्या वकिलांनी केलाय.