
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली आहे. तसेच यातील आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुनावणीदरम्यान राजेंद्र हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी धक्कादायक दावे केले आहे. यामुळे आता वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर चर्चा होत आहे. तिने दुसऱ्या कुणामुळे आत्महत्या केली असा दावा करण्यात आला आहे. याबाबत वकिलांनी तो व्यक्ती कोण आहे, याची माहिती दिली आहे.