
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान काल पुणे पोलिसांना निलेश चव्हाणला पकडून ठेवल्याच एक कॉल आला पण तिथे पोहोचल्यावर पोलिसांना ती माहिती खोटी असल्याचे आढळून आल्याने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.