
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे .या प्रकरणात फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पहाटे बावधन पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही बापलेक एका खेडेगावात लपून बसले होते. नंतर ते स्वारगेट परिसरात आले. पोलिसांच्या टीम हगवणे यांच्या मार्गावर होत्या. अखेर शुक्रवारी पहाटे दोघांना अटक केली आहे.