
Vaishnavi Hagwane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर शुशील हगवणे या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतलं. पण वैष्णवीचा मृत्यू झाल्याच्या तारखेपासून म्हणजेच १६ मे पासून फरार होते. पण आज त्यांना अटक झाली, त्यावेळी ते काय करत होते? हे एका सीसीटीव्हीत कैद झालं आहे. या सीसीटीव्हीच्या आधारेच पोलिसांनी या दोघांचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतलं.