esakal | अवैध धंद्यावर वालचंदनगरमध्ये पोलिसांचे छापे
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime

अवैध धंद्यावर वालचंदनगरमध्ये पोलिसांचे छापे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : कळंब व सणसर (ता.इंदापूर)येथे वालचंदनगर पोलिसांनी बेकायदेशीर मटक्याच्या व ताडीच्या अड्यावर छापा टाकून २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करुन पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पृथ्वीराज उमेश घोडके, उमेश घोडके , आस्लम मौला पठाण (रा.सर्वजण,कळंब), क्षितीज वनसाळे (रा.नऊदारे ) व नवनाथ महादेव खरात ( रा.लासुर्णे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कळंब व सणसर परीसरामध्ये मटक्याचा व ताडीचा अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवार (ता.११) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कळंब गावच्या हद्दीतील पठाणवस्तीवरील कॅनॉलचे पुलावर छापा टाकण्यात आला. यावेळी पाेलिसांनी २४ हजार २२३ रुपयांची रोख रक्कम, व दोन लाख रुपयांची दुचाकी असा २ लाख २४ हजार २२३ रुपये व मटक्याची पेन,कागदे अशी साधणे जप्त केली. दुसऱ्या छापा पोलिसांनी सणसर गावच्या हद्दीमध्ये ओढ्यालगतच्या ताडीच्या अड्यावर टाकून २१०० रुपयांची ३५ लिटर ताडी जप्त करुन नवनाथ महादेव खरात ( रा.लासुर्णे)याच्यावर गुन्हा दाखल केला.

loading image
go to top