वल्लभनगर आगाराचे पालटतेय रूप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पिंपरी - नवीन नळ, आकर्षक टाइल्स, बेसिन, दरवाजे, इलेक्‍ट्रिक फिटिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेरे, रंगकाम यांसारख्या कामांमुळे एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारातील वाहकांना विश्रांती घेण्यासाठीच्या जागेचे रूप पालटले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

पिंपरी - नवीन नळ, आकर्षक टाइल्स, बेसिन, दरवाजे, इलेक्‍ट्रिक फिटिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेरे, रंगकाम यांसारख्या कामांमुळे एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारातील वाहकांना विश्रांती घेण्यासाठीच्या जागेचे रूप पालटले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

वल्लभनगर आगारात विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील सुमारे १५० बस मुक्कामी येतात. त्यांसमवेत चालक, वाहक मिळून २५० ते ३०० जण येतात. त्यांच्या राहण्यासाठी आगारातील दोन मजल्यांवर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून त्याची वेळच्यावेळी डागडुजी न केल्याने स्वच्छतागृह, बेसिन, भिंती यांची दुरवस्था झाली होती. 

या पार्श्‍वभूमीवर महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने विश्रांती कक्षाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी रोटरी क्‍लबनेही मदतीचा हात पुढे केला आहे. या मजल्यांच्या खिडक्‍या, टाइल्स, प्लंबिंग, नवीन दरवाजे इ. कामे महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहेत. या विश्रामगृहात नवीन नळही बसविण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांच्या बाहेरील जुने खराब पाइप बदलून त्याजागी नवीन पाइप बसविण्यात येत आहेत. भिंतींची रंगरंगोटी रोटरी क्‍लबच्या वतीने करण्यात आली आहे. चालक- वाहकांना झोपण्यासाठी बेड, दूरचित्रवाणी संचही रोटरी क्‍लबच्या वतीने देण्यात येणार आहे. भविष्यात क्‍लबच्या वतीने चालक- वाहकांसाठी व्यायामशाळाही सुरू करण्यात येणार आहे.

चालक- वाहकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या विश्रांती कक्षाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त रोटरी क्‍लबच्या वतीनेही अन्य कामे करण्यात येत आहेत.
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ

Web Title: Vallabhnagar Depo Development

टॅग्स