
पुणे : सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या, शहराचा झालेला विस्तार, बड्या व्यक्तींकडून मिळणारा आश्रय, ओळख न पटण्याची शक्यता, पुण्याचा इतर शहरांशी असलेला कनेक्ट, लपण्यासाठी आवश्यक व्यवस्था आणि उपलब्ध असलेली संपर्क यंत्रणा यामुळे राज्यातील विविध ठिकाणांसह देशभरातून विविध गुन्ह्यातील आरोपी पुण्यात लपत आहेत.