
प्रसाद कानडे
पुणे : लातूरमधील मराठवाडा कोच फॅक्टरीतून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या स्लीपर (शयनयान) डब्यांसाठी प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. लातूरमधील कोच फॅक्टरीमध्ये नुकतेच चेन्नई येथील एका कंपनीत तयार करण्यात आलेला डब्यांचा सांगाडा (कारबॉडी) दाखल झाला आहे. डब्यांच्या उत्पादनासंदर्भात रेल्वे बोर्ड व ‘किनेट’ या कंपनीमध्ये करार झाला. त्यानुसार डब्यांची जुळणी झाल्यावर वेगवेगळ्या पातळीवर तपासणी केली जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात डब्यांच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे. जून २०२६पर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसचा एक स्लीपर रेक तयार होईल.