
Varandh Ghat: राज्यात पावसाचा जोर वाढला असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान, दरडी कोसळण्याची शक्यता, रस्ता खचणे, माती वाहून जाणे यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणारा वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.