वरंध घाटात बचावकार्य पाहणीला गेलेले अधिकारी, पोलीस; अचानक दरड कोसळली, बाजूला पळाल्यानं वाचले

Varandha Ghat Rescue Team Reaches Bhor via Alternate Route: पुण्यातील भोरहून महाडला जाणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळल्याच्या अनेक घटना घडत आहेत. या दरडी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, पाहणीसाठी गेलेले अधिकारीही अडकल्याची घटना घडलीय.
Varandha Ghat Landslide

Varandha Ghat Landslide

Esakal

Updated on

Varandha Ghat Landslide: पुण्यातील भोरहून कोकणात महाडला जाणाऱ्या वरंध घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. रविवारपासून मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. शिरगाव हद्दीत कोसळलेल्या दरडीमुळे २० पेक्षा जास्त वाहने आणि ७० ते ८० प्रवासी अडकले होते. दरड हटवल्यानंतर ३० तासानंतर सोमवारी सायंकाळी सहा वाजता वाहने मार्गस्थ झाली. दरम्यान, हिर्डोशीत पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडलीय. यामुळे ५ ते ६ गाड्या अडकल्या आहेत. यावेळी पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारीही घाटात अडकले होते. ते पर्यायी मार्गाने रात्री भोरला रवाना झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com