
कात्रज - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सर्व गणेशभक्त सज्ज झालेले दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात वैविध्यपूर्ण मूर्ती दाखल झाल्या आहेत. गणेशमूर्तींसह सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झालेली दिसत आहे. मात्र, गणेशभक्तांच्या उत्साहावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. खरेदीसाठी गणेशमूर्ती स्टॉल आणि साहित्यांच्या दूकानांवर शहरासह उपनगरांमध्ये गर्दी दिसत आहे. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी भक्तांसह विक्रेत्यांनीही जय्यत तयारी केली आहे.