दृष्टिक्षेपात

दृष्टिक्षेपात
Published on

दृष्टिक्षेपात

मुंबई परिसर

वसई परिसरात
आढळला सांगाडा

पालघर : वसई परिसरातील एका मैदानावर मानवी सांगाडा आणि कवटी आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली. वसईतील आनंद नगर येथील मैदानावर रविवारी संध्याकाळी काही मुले खेळत असताना त्यांना हे अवशेष दिसले. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात आगीच्या घटना घडल्या होत्या. घटनास्थळी काही नाणीदेखील सापडली आहेत.
-------

गांजाविक्री
करणारा अटकेत

उरण : अमली पदार्थांविरोधातील कारवाईत गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला उरण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मनीरूल अयनुल हक (३९) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे दोन लाख ७८ हजार रुपये किमतीचा दोन किलो ७८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. उरण परिसरात अमली पदार्थावरील वाढती तस्करी आणि त्याच्या विळख्यात तरुणाई येत असल्याचे दिसत असून, पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com