
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. या बस स्थानकात ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेचे तीव्र पडसाद देखील उमटले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते वसंत मोरे स्वारगेट बस स्थानकात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली.