'लोड घेऊ नका मी...'; पक्ष सोडण्याच्या चर्चेवर मनसे नेत्याचं स्पष्टीकरण

वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आणि माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांच्या मनसे सोडण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
निलेश माझीरे
निलेश माझीरेSakal

पुणे : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांचे कट्टर समर्थक आणि माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांच्या मनसे सोडण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या सर्व चर्चांचे खंडन करून माझीरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण मनसेतच राहणार असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं आहे. माझ्याविरोधात माध्यमांत चर्चा रंगवून कटकारस्थान रचलं जातंय असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

निलेश माझीरे
...तर मी राजकारण सोडेन; संदीप देशपांडेंचं ठाकरे सरकारला आव्हान

निलेश माझीरे यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मनसे पक्षाच्या अंतर्गत वादामुळे आणि गटबाजीमुळे ते पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात होतं पण निलेश माझीरे यांनी फेसबुक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात की, "काल रात्रीपासून मी शिवेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही न्यूज चॅनलवर फिरू लागल्या आहेत. पण मी माझ्या फेसबुक पोस्टद्वारे सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो की मी मनसे आणि वसंत तात्या मोरे यांना सोडणार नाही." असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

निलेश माझीरे
मल्हाररावांनी तेव्हाच ज्ञानवापी मशीद पाडली असती पण काशीच्या पुरोहितांनी...

शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांच्या भेटीवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी स्वारगेट येथे कब्बडी स्पर्धेसाठी गेलो होतो, त्याठिकाणी शिवसेनेचे सचिन अहिर साहेब आले होते. त्यांना मी पुष्पगुच्छ देण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण मी कुठंही शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं बोललो नाही. मी वसंत तात्या मोरे आणि मनसेला सोडणार नाही, हे माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचलं जातंय." असं ते आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगतात.

"माझ्याविरोधात कारस्थान रचणाऱ्या विरोधकांनी मी एवढंच सांगतो की, तुम्ही जास्त लोड घेऊ नका मी मनसेतच आहे." असा इशारा करत माझीरे यांनी सायंकाळी सात वाजता लाईव्ह येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामधून ते परत एकदा मनसे सोडणार नसल्याचं स्पष्टीकरण देणार असल्याचं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com