Vasant More | 'आपण चुकीच्या दिशेने आहोत', वसंत मोरेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More News

'आपण चुकीच्या दिशेने आहोत', वसंत मोरेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेपासूनच चर्चेत आहे. पण त्याचसोबत आणखी एका व्यक्तीची चर्चा आहे. ही व्यक्ती म्हणजे मनसे नेते वसंत मोरे. राज ठाकरेंच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वसंत मोरेंच्या संदर्भात घडलेल्या घडामोडींमुळे वसंत मोरेंकडे राज्याचं विशेष लक्ष आहे. (Vasant More news)

मोरे मनसे सोडणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, त्यांनी भूमिका स्पष्ट करत मनसेतच राहणार असल्याचं सांगितलं. राज ठाकरे यांच्या पुण्याच्या दौऱ्यातही मोरे न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. पण आता वसंत मोरे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झालंय. (Vasant More Speaks over Ajaan Controversy)

हेही वाचा: 'तात्या, काहीतरी चुकतंय', वसंत मोरेंनी हात जोडताच कमेंट्सचा पाऊस

ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही त्यांनी रस्ता बदला आपण चुकीचा दिशेने आहोत आणि आजकाल याचे अनुभव येत आहेत, असं स्टेटस मोरे यांनी ठेवल्यानंतर त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. वसंत मोरे यांनी यापूर्वी देखील भोंग्यांविरोधत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरेंच्या भेटीनंतर ठाण्यातील सभेत भाषण देखील केलं होतं. मात्र, पुण्याच्या कार्यक्रमात ते अनुपस्थित होते. गेल्या २ दिवसांपासून वसंत मोरे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे ने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यात मोरे गायब असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

हेही वाचा: राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना

वसंत मोरेंचं फेसबूक स्पष्टीकरण

पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले.

म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे हार्दिक आभार...!

Web Title: Vasant More Status On Social Media Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Vasant More
go to top