राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना | FIR Against Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIR Against Raj Thackeray | Vasant More news

राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना

पुणे : औरंगाबाद येथील सभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आणि सभेत घातलेल्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेचे राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून मनसे कार्यकर्ते आणि पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे हे तिरुपती बालाजीला रवाना झाले आहेत.

(MNS Vasant More Moves To Tirupati Balaji)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेतील वक्तव्यामुळे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मनसेचे वसंत मोरे आता तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: "शेवटचा एक दिवस बाकी... भोंगे बंद झालेच पाहिजे"; मनसेचा रिमाइंडर

दरम्यान गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या सभेमध्ये त्यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याबाबत वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावर वसंत मोरेंनी आपण सहमत नसल्याचं सांगितलं होतं. राज ठाकरे यांच्या वक्तव्याला सहमत नसल्याने त्यांच्याकडे असलेलं पुण्याचं शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं होत. साईनाथ बाबर हे पुण्यचे नवे मनसे शहराध्यक्ष झाले असून त्यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे बाहेर आलं नव्हतं पण वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट टाकत आपण काहीच गमावलं नाही असं सांगितलं होतं.

त्यानंतरच्या उत्तर सभेत त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली होती. पण त्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. तेव्हापासून वसंत मोरे हे मनसेच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसले नाहीत. दरम्यान राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादला सभेसाठी रवाना होण्याच्या आदल्या दिवशी वसंत मोरे यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचं आपल्याला पहायला मिळालं होतं.

हेही वाचा: स्वराज्याचं वैभव असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाला उद्ध्वस्त कुणी केलं?

पुण्यातील नगरसेवक आणि मनसेचा मोठा चेहरा असलेले वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना आता तिरुपती बालाजीच्या दर्शनाला रवाना झाले आहेत.

Web Title: Raj Thackeray Case File Vasant More Move Tirupati Balaji

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top