Patas Crime : वासुंदे येथे बॅंकेच्या खासगी वसुली एजंटचा खुन

पाटस -बारामती पालखी मार्गावर वासुंदे (ता. दौंड) हद्दीत पुणे येथील बॅंकेच्या खासगी वसुली एजंटचा धारदार शस्त्राने भोकसुन खुन केल्याची धक्कादायक घटना घडली.
Murder
Murdersakal

पाटस - पाटस -बारामती पालखी मार्गावर वासुंदे (ता. दौंड) हद्दीत पुणे येथील बॅंकेच्या खासगी वसुली एजंटचा धारदार शस्त्राने भोकसुन खुन केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रविण मळेकर (वय-५५, रा. गुरुवार पेठ, पुणे) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मळेकर हे शुक्रवारी (ता. १) बारामती येथे एका बॅंकेचे वसुली नोटीस बजावुन दुचाकीवरुन परताना रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत रुषीकेश प्रविण मळेकर रा.पुणे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माहीती दिली. फिर्यादी ऋषीकेश मळेकर यांची रिकव्हरी एजन्सी आहे. प्रविण मळेकर हे खासगी वसुली एजंट होते. शुक्रवारी (ता. १) सकाळी प्रविण मळेकर हे पुण्यावरुन दुचाकीने बारामतीला एका बॅंकेचे वसुली नोटीस घेवुन गेले.

बारामतीत दिवसभर काम आटोपल्या नंतर ते सायंकाळी पालखी मार्गाने पाटस दिशेला निघाले. रात्री वासुंदे हद्दीत येताच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पोटात धारदार शस्त्र भोकसले. ते जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजुला पडले. त्यांच्या पोटात तसेच शस्त्र व सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. या दृश्याने अनेकांचे काळीज पिळवटुन गेले.

पोलिसांनी माहीती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.तसेच मुलगा फिर्यादी यांना घटने बाबत कळविले.नागरीकांनी जखमी मळेकर यांना रुग्णवाहीकेतुन लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र,रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. मयत मळेकर त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा असा परीवार आहे. चार दिवसापुर्वी त्यांचा लग्नाचा वाढदिवस झाला होता. अत्यंविधी प्रसंगी माजी महापोर मुरलीधर मोहोळ, भाजपाचे शहर अध्यक्ष धिरज घाटे, हेमंत रासणे आदी राजकीय पदाधिकारी तसेच शोकाकुल जनसमुदाय उपस्थीत होता. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

दरम्यान, भररस्त्यात हा प्रकार घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली.घटनेच्या तपासकामी पोलिस निरक्षक चंद्रशेखर यादव यांनी तत्काळ पोलिस पथक तयार केले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले असुन चौकशी सुरु आहे. याच संशयितांकडुन काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com