Pune Crime : वासुंदे पुलाखाली स्विफ्ट कारमधून १ लाखाचा बनावट मद्यसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई!

Fake Liquor Seizure : वासुंदे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्विफ्ट कारमधून बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला. चालक फरार झाला असून एकूण ६.५२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
Large Stock of Fake Liquor Seized by Pune Excise Team

Large Stock of Fake Liquor Seized by Pune Excise Team

Sakal

Updated on

दौंड : पुणे जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वासुंदे येथे केलेल्या कारवाईत एक लाख रूपये मूल्य असलेला बनावट मद्याचा साठा जप्त केला आहे. कारवाई दरम्यान वाहनचालकाने पलायन केले. दौंड तालुक्यातील वासुंदे ( ता. दौंड) - उंडवडी ( ता. बारामती ) मार्गावर वासुंदे येथे पुलाखाली शुक्रवरी ( ता. २१) रात्री ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुलाखाली संशयास्पदरित्या मारूती स्विफ्ट मॅाडेल वाहन थांबलेले आढळून आले. वाहनचालकाने त्याचे नाव श्रीनाथ माने असे सांगितल्यावर पथकाने त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. वाहनात शासनाचा महसूल बुडवून आणलेला आणि बनानट बूच लावलेल्या ४३२ बाटल्याांचा मद्य साठा आढळून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com