Vidhan Sabha 2019 :..म्हणून बारामतीत 'वंचित'चा उमेदवार करणार उपोषण?

मिलिंद संगई
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बुधवारी येताहेत बारामतीत.

- पण या सभेला पोलिसांनी नाकारली परवानगी.

बारामती शहर : शहरातील तीन हत्ती चौकात पोलिस प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्याने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश गोफणे आता उपोषण करणार आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. 16) दुपारी तीन वाजता बारामती शहरात सभेसाठी वेळ दिलेली आहे. अविनाश गोफणे यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. सभेसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून तीन हत्ती चौकाची मागणी गोफणे यांनी केली होती. मात्र, तीन हत्ती चौकात रहदारी असते, येथे सभेला परवानगी दिली तर नागरिकांची गैरसोय होईल व रस्ता बंद करावा लागेल या कारणाने पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी येथे सभेला परवानगी नाकारली.

नगरपालिकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत सभा घ्यावी असे पाटील यांनी सुचविले होते. मात्र, तीन हत्ती चौकात जागा जास्त असल्याने येथे सभेला परवानगी द्यावी, असा गोफणे यांचा आग्रह आहे. 

विविध राजकीय नेत्यांच्या सभांसह रॅलीलाही व यात्रांना परवानगी दिली जाते. मग वंचितच्या सभेला परवानगी नाकारण्यामागे संबंधित अधिका-यांवर नेमका कोणाचा दबाव आहे, असा सवाल अविनाश गोफणे यांनी केला आहे.

सभेला परवानगी दिली नाही तर बारामती शहर पोलिस ठाण्याच्या दारात उपोषणास बसू असा इशारा गोफणे यांनी दिला आहे. आता यामुळे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VBA Candidate Avinash Gophane may do Hunder Strike Maharashtra Vidhan Sabha 2019