esakal | पुणे : वीर धरण शंभर टक्के भरले; ९ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : वीर धरण शंभर टक्के भरले; ९ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू

पुणे : वीर धरण शंभर टक्के भरले; 9 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परिंचे : नीरा नदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वीर (ता.पुरंदर) धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी (दि.१३) रोजी दुपारी चार वाजता धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दोन वक्र दरवाजे चार फुटांनी उचलून निरा नदी पात्रात ९२७४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरण प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक यांनी सांगितले. नीरा नदी खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात शंभर टक्के पाणी साठा झाला आहे.

वीर धरणात ९.८३ टीएमसी पाणी साठा झाला असून धरण शंभर टक्के भरले आहे. भाटघर धरणात २३.७५ टीएमसी पाणी साठा झाला असून धरण शंभर टक्के भरले आहे. नीरा देवघर धरणात ११.९१ टीएमसी पाणी साठा झाला असून धरण शंभर टक्के भरले आहे. गुंजवणी धरणात ३.६५ टीएमसी पाणी साठा झाला असून धरण ९८.७६ टक्के भरले आहे. भाडघर धरणातून ८६२४ क्युसेक पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. नीरा देवघर धरणातून नीरा नदी पात्रात ४२३८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. गुंजवणी धरणातून ९९८ क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडले आले आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

दहा ऑगस्ट रोजी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वीर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला होता. एक महिन्याच्या विश्रांती नंतर नीरा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने आज धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येत्या चोवीस तासांमध्ये वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २९२३९ दशलक्ष घनफूट इतकी आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक्स व डावा कालवा मधून ८२७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! 'कोव्हॅक्सिन'ला या आठवड्यात WHOची मिळणार मंजुरी

नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये मिळून ४८ टीएमसी म्हणजे शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणी साठा झाला होता. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक यांनी सांगितले यावेळी विजय वाल्मिक, संभाजी शेडगे, सचिन धुमाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top