esakal | पुण्यातील वीर धरण शंभर टक्के भरले
sakal

बोलून बातमी शोधा

ver.jpg

 वीर (ता. पुरंदर) धरणाचा एक दरवाजा एक फुटाने उचलून उचलण्यात आला असून निरा नदी पात्रात ११५०क्युसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

पुण्यातील वीर धरण शंभर टक्के भरले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

परिंचे : वीर (ता. पुरंदर) धरणाचा एक दरवाजा एक फुटाने उचलून उचलण्यात आला असून नीरा नदीपात्रात ११५० क्युसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

नीरा नदी पात्रात एकूण १९५० क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले.

बुधवारी (दि.१२) रोजी संध्याकाळी पाच वाजता वीर धरण शंभर टक्के भरले कार्यकारी अभियंता संजय बोडके यांच्या हस्ते नवीन पाण्याचे जलपूजन करून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. नीरा नदी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.  गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून वेळवंडी व कानंदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदीपात्रात येत आहे.

धरणात ९७३३ एमटीएफसी पाणीसाठा असून धरणाची पाणी पातळी ५७९.६४ मीटर आहे. धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत.यावेळी घेतलेल्या आकडेवारीनुसार भाडगर धरणात १७ टिएमसी पाणी साठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे.नीरा देवघर धरणात ७ टिएमसी पाणी साठा असून धरण ५९.१३ टक्के भरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वीर धरणावर फलटण, इंदापूर, बारामती, माळशिरस, सांगोला हे तालुके ओलिताखाली येत असून मोठे लाभ क्षेत्र या धरणावर अवलंबून असल्याचे अभियांत्रिकी सहाय्यक अभियंता संजय भोसले यांनी सांगितले.यावेळी संभाजी शेडगे, अरुण भोसले आदी अधिकारी उपस्थित होते. सासवड (ता.पुरंदर) शहरासह अनेक गावच्या पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत.