काशी पीठ जगद्‍गुरू अनुष्ठान व सजावट

काशी पीठ जगद्‍गुरू  अनुष्ठान व सजावट
Published on

PNE26W42046 - जिथे गुरूंच्या तेजाने भक्तीची भावना उजळून निघते तिथे स्वर्ग अवतरतो, असेच दृश्य विद्युत रोषणाईने उजळलेल्या वीर तपस्वी मंदिराचे श्रावणाच्या प्रारंभी केलेल्या सजावटीने दिसत होते. ( या फोटोसाठी विशेष जागा आहे, बातमीचे फोटो आले कि देतो)

जणू आद्य-विद्यमान जगद्गुरू श्रावणात पंचमुखी परमेश्वरांच्या भेटीला.......
अनुष्ठानी काशी जगद्गुरू स्वागताला डिजिटली उभे; विद्युत रोषणाईने उजळले वीरतपस्वी मंदिर व महाद्वार


सकाळ वृत्तसेवा
एकीकडे अखंड गुरुपरंपरा... दुसरीकडे पंचमुखी परमेश्वराचे सान्निध्य... आणि या दोघांना जोडणारे जणू साक्षात गुरुतत्त्व! श्रावणाच्या प्रारंभी अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिरात प्रवेश करताच हे अध्यात्मिक दृश्य भाविकांना अंतर्मुख करते. पाच आद्य आणि पाच विद्यमान जगद्गुरूंचे डिजिटल रूप जणू पंचमुखी परमेश्वराच्या दर्शनासाठी पुढे सरसावत आहे; त्यांच्या स्वागताला काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी उभे आहेत. मंदिराची विद्युत रोषणाई या दृश्याला अधिक खुलवत असताना तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची तपोवाणी व त्यातील श्लोकांचा अर्थ भक्तांच्या अंतर्मनाला स्पर्श करीत आहे. या भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात काशीपीठाचे जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या श्रावण मासातील अनुष्ठानास प्रारंभ झाला.
-----------------
लघुरुद्राभिषेकाने अनुष्ठानाचा प्रारंभ
सकाळी पाच दांपत्यांच्या हस्ते श्री पंचमुखी परमेश्वरांच्या शिवलिंगास लघुरुद्राभिषेक करण्यात आला. जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते महामंगलारती झाली. यानंतर जगद्गुरूंनी भाविकांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
--------------------
अशी आहे दहा जगद्गुरूंची डिजिटल मांडणी
महाद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला पाच आद्य जगद्गुरूंची छायाचित्रे व माहिती असलेले डिजिटल पिलर आहेत.
उजव्या बाजूला आद्य जगद्‍गुरू - श्री रेवणराराध्य भगवत्पाद, श्री मरुळाराध्य भगवत्पाद, श्री एकोरामाराध्य भगवत्पाद, श्री पंडिताराध्य भगवत्पाद आणि श्री विश्वाराध्य भगवत्पाद
डाव्या बाजूला - रंभापुरी जगद्गुरू श्री प्रसन्न रेणुका वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैनी जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, हिमवत केदार जगद्गुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महासंघ, श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी
मध्यभागी काशी जगद्गुरूंचे डिजिटल रूप - या मांडणीच्या मध्यभागी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे डिजीटल या १० जगद्‍गुरूंच्या स्वागताला उभे असल्याचे चित्र संपूर्ण वीरशैवातील गुरूपरंपरा दर्शवते.
------------------------
पहिल्यांदाच भव्य विद्युत रोषणाई
वीरतपस्वी मंदिरात प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. एकूण २० डिजिटल पिलर असून, त्यांच्या समोर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मांडणीला उठाव मिळाला आहे. प्रकाशात गोपुरम्, महाद्वार आणि आद्य जगद्गुरू पंडिताराध्य महास्वामीजींचे तेजस्वी रूप अधिक खुलून दिसत आहे.
----------------------
भजनसेवा
या श्रावणात अतुल बेले, जयेश कुलकर्णी, प्रणिती चांगभले, आदिती कुलकर्णी, यशोमती कुलकर्णी, झंकार कुलकर्णी, पूजा परकीपंडला, सारिका आठल्ये, समीर रणदिवे, भरतेश तडवळकर आणि स्वानंद आठल्ये आदी भजनसेवा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com