पुणे : मार्केट यार्डातील ताज्या अपडेटसाठी ही बातमी वाचाच...

market.jpg
market.jpg
Updated on

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केटयार्डातील भाजीपाला, फळे आणि इतर विभागात शेतमालाची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी भाजीपाल्याची आवक वाढली. मात्र, शहरातील लहान मोठ्या मंडई अद्याप नियमित सुरू झाल्या नसल्याने शेतमालास उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तसेच फळबाजारात मागील आठ दिवसांच्या तुलनेत काही प्रमाणात आवक वाढली आहे. बाजारात नेहमीच्या तुलनेत वीस ते तीस टक्केच आवक आहे. मात्र, मागणी कमी असल्याने सर्व फळांचे भाव आवाक्यात आहेत. पुढील आठ ते पंधरा दिवसांत फळबाजार पूर्ववत होण्याचा अंदाज  अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी वर्तविला.

मार्केट यार्डात रविवारी साधारणतः ६० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये सिमला येथून १ ट्रक मटार, मध्यप्रदेश येथून लसूण १० ट्रक, गुजरात येथून २ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून २ टेम्पो घेवडा तसेच १ टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली. तर, पुणे विभागातून सातारी आले ३५० ते ४०० पोती, भेंडी व गवार प्रत्येकी २ टेम्पो, टोमॅटो ३०० ते ४०० क्रेटस्, फ्लॉवर ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची २ ते ३ टेम्पो, गाजर २ टेम्पो, तांबडा भोपळा ४ ते ५ टेम्पो, कांदा ३५ ते ४० टेम्पो व आग्रा, इंदौर येथून १० ते ११ ट्रक बटाटा दाखल झाला, असल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फळबाजारात अननस १० क्विंटल, मोसंबी १३३ क्विंटल, संत्री ४४ क्विंटल, डाळिंब १३१ क्विंटल, पपई ५१८ क्विंटल, लिंबे १२० क्विंटल, पेरू १०० क्रेट, चिकू १३० क्विंटल, कलिंगड ४०० क्विंटल, सफरचंद ५६१ क्विंटल, द्राक्षे २४ क्विंटल, खरबुज ८४ क्विंटल, आंबा ७२२ क्विंटल इतकी आवक झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे (क्विंटलमध्ये) :

लिंबे : ९००-२५००, अननस : १२००-२४००, मोसंबी : २०००-३०००, संत्रा : १००००-१२०००, डाळिंब : २०००-६५००. कलिंगड : ५००-८००, खरबूज : ७००-१५००, पपई : ७००-१५००, चिकू : १५००-४५००, सफरचंद : १००००-१५०००, द्राक्षे : १००००-१७०००, पिअर : १५०००-१७०००, पल्म १२०००-१४०००, ड्रॅगन : ८००० ते १२०००, अंजिर : ३०००-७००० इतका भाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com