
उत्पादक शेतकरी भाजीपाल्याची खोती घेणारया व्यापारयांच्या मागे लागून काय पदरी मिळेल का याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
माळशिरस : बाजारात सध्या कोथिंबीर, मेथी,पालक या सर्वच भाज्या मातीमोल किंमतीत विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांना या भाज्या काढून बाजारात विक्रीसाठी नेण्यास देखील परवडत नाहीत. यामुळे उत्पादक शेतकरी भाजीपाल्याची खोती घेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मागे लागून काय पदरी मिळेल का याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या बाजारात कोथिंबीर, मेथी, पालक या भाज्या एक रूपये ते तीन रूपये अशा कमी किमतीत विकल्या जात आहे. अनेकदा बाजारात न खपता भाज्या तशाच टाकून देखील दयावे लागत आहे.
यामुळे भाजीपाला काढणाऱ्या महिलांना दोनशे रुपये मजूरी देऊन नंतर वाहतूक खर्चही भागत नाही. उत्पादकांना भाज्या शेतातून कशा का होईना बाहेर काढून दोन पैसे मिळावेत या आशेने यामुळेच व्यापाऱ्यांना विनवणी करावी लागत आहे. त्यातून बी बियाणे, मशागतीचे तरी दोन पैसे निघतील असा प्रयत्न शेतकरी करीत आहे.
- मोठी बातमी: शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; 6 हजार जागांसाठी होणार भरती
जनावरांना चारने देखील धोक्याचे-
काही ठिकाणी पालक भाज्यावर कीटकनाशक फवारणीमुळे अशा भाज्या मेंढ्यांनी खाल्ल्याने मेंढ्या दगावण्याचे प्रकार देखील झाले आहेत. यामुळे भाज्या मेंढपाळांना चरावयास देण्यासाठी देखील धोक्याचे वाटत आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)