esakal | Coronavirus : पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडई बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri-Mandai

मंडईमध्ये एकूण १८० गाळेधारक भाजी विक्रेते असून मंडई बाहेरील मोकळ्या जागेत सुमारे दोनशेहून अधिक अनधिकृत भाजी विक्रेते व्यवसाय करत होते. सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात देखील मंडईत भाजीपाला खरेदी साठी मोठी गर्दी होत होती. 'सोशल डिस्टन्सिंग'ला हरताळ फासला जात होता. त्यामुळे, काही दिवसांपूर्वी महापालिकेने सलग ३ दिवस कारवाई करत मंडई बाहेरील जागेतील अनधिकृत भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविली.

Coronavirus : पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडई बंद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गर्दी टाळण्यासाठी पिंपरी कॅम्प येथील श्री लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई पोलीसांनी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, सध्या मंडई दिवसभरासाठी बंद ठेवली जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मंडईमध्ये एकूण १८० गाळेधारक भाजी विक्रेते असून मंडई बाहेरील मोकळ्या जागेत सुमारे दोनशेहून अधिक अनधिकृत भाजी विक्रेते व्यवसाय करत होते. सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात देखील मंडईत भाजीपाला खरेदी साठी मोठी गर्दी होत होती. 'सोशल डिस्टन्सिंग'ला हरताळ फासला जात होता. त्यामुळे, काही दिवसांपूर्वी महापालिकेने सलग ३ दिवस कारवाई करत मंडई बाहेरील जागेतील अनधिकृत भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविली. 

मंडईत गर्दी होत असल्याने पोलीसांनी देखील त्या ठिकाणी सौम्य लाठीमार देखील केला होता. मात्र, अखेर पोलीसांनी मंडई पूर्ण दिवसभरासाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, मंडई दिवसभरासाठी बंद ठेवली जात आहे. 

बाजार समितीचे पिंपरी उपबाजार प्रमुख राजू शिंदे यांनीही याला दुजोरा दिला. 

"गर्दी कमी होत नसल्याने पोलीसांच्या आदेशानुसार आम्ही दिवसभरासाठी मंडई बंद ठेवली आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड येथून भाजीपाला आणणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे, पहाटेच्या वेळेस शेतकऱ्यांनी मंडईत आणलेल्या मालाची खरेदी करून विक्री करत आहोत. सध्याच्या काळात ग्राहकांनी देखील मंडईत गर्दी न करता घराजवळच्या दुकानांमधून भाजीपाला खरेदी करावा."
- सुनील कुदळे, अध्यक्ष, श्री लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई, पिंपरी

loading image
go to top