Vegetable Rate : कोथिंबीर 50 रुपये, पालक 40 रुपये अन् मेथी 30 रुपये जुडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetable Rate Coriander Rs 50 Spinach Rs 40 Fenugreek Rs 30 pune

Vegetable Rate : कोथिंबीर 50 रुपये, पालक 40 रुपये अन् मेथी 30 रुपये जुडी  

पुणे : सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्या खराब झाल्या आहेत. पितृपक्षामुळे पालेभाज्यांना बाजारात मागणी आहे. त्यामुळे कोथिंबीरीच्या एका जुडीला ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांचे जुडीचे दर २० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यात पावसामुळे खराब भाज्या बाजारात येत आहेत. ज्याठिकाणी पाऊस कमी झाला आहे, त्या ठिकाणावरून काही प्रमाणात दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे. मात्र, हे प्रमाण अवघे वीस तर पंचवीस टक्केच आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात.

मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब भाज्याचे प्रमाण वाढले आहे. मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची १ लाख २५ हजार जुडी व मेथीची ५० हजार जुडी आवक होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक टिकून आहे.

पावसामुळे पालेभाज्यांच्या खराब झाल्या आहेत. बाजारात येणाऱ्या भाज्यांचा दर्जा खालवला आहे. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने मागणी जास्त आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत.
- प्रकाश ढमढेरे, किरकोळ भाजी विक्रेते

पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव (२० सप्टेंबर)
- कोथिंबीर - ४० ते ५० रुपये
- मेथी - २५ ते ३० रुपये
- पालक - ३० ते ४० रुपये
- चुका - २० ते २५ रुपये
- पुदिना - १० ते १५ रुपये
- शेपू - २० ते २५ रुपये

Web Title: Vegetable Rate Coriander Rs 50 Spinach Rs 40 Fenugreek Rs 30 Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..