Corona Virus : मार्केटयार्ड बंद: पुण्यात भाजीपाल्याचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

आज गुढी पाडव्याचा सण असल्याने ग्राहकांनी घराच्या बाहेर पडणे टाळले. मोदींनी रात्री लॉक डाऊनची घोषणा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर जीवनावश्यक वस्तू चालू राहणार असल्याने थोडाफार दिलासा मिळाला. रात्रीच्या वेळी ग्राहकांनी किराणा दुकाने, भाजीपाला दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु आज सकाळी शहरातील जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने चालू होती

मार्केटयार्ड(पुणे) : अडते असोसिएशन आणि कामगार संघटना बंद पुकारल्याने आज मार्केट यार्डात भाजीपाल्याची पाच गाड्यांची आवक झाली. त्यात मार्केट यार्डात ग्राहक नसल्याने शेतकरी हा माल पिंपरी चिंचवड येथील बाजारात घेऊन गेले. शहरासह उपनगरात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज गुढी पाडव्याचा सण असल्याने ग्राहकांनी घराच्या बाहेर पडणे टाळले. मोदींनी रात्री लॉक डाऊनची घोषणा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर जीवनावश्यक वस्तू चालू राहणार असल्याने थोडाफार दिलासा मिळाला. रात्रीच्या वेळी ग्राहकांनी किराणा दुकाने, भाजीपाला दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु आज सकाळी शहरातील जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने चालू होती. त्यामुळे काहीप्रमाणात नागरिकांनी सकाळच्या वेळेत भाजीपाला, किराणा आणि दुधाची खरेदी केली.

Coronavirus : घाबरू नका, लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक सेवा सुरुच

मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक नसल्याने शहरासह उपनगरात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भुसार बाजार बंद असल्याने किराणा दुकानातील माल संपुष्टात येत आहे. त्यामुळे किराणा मालाचे भाव ही वाढत आहेत. पुढील काही दिवस मार्केट यार्ड बंद राहिले तर शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि धान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यायाबत प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable shortage in Pune due to market yard Bandh