esakal | अरे देवा! लाॅकडाऊन उठला पुणेकरांच्या मुळावर; जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Bhaji-Mandai

दोडका, कोबी, फ्लाॅवर, भेंडी, मिरची, गवार, आद्रक, लसूण यासाठी पाव किलोला २५ ते ३० रुपये मोजावे लागत होते. कांदा, बाटाटा यांनी ही चांगलाच भाव खाल्ला.

अरे देवा! लाॅकडाऊन उठला पुणेकरांच्या मुळावर; जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रोखायचा म्हणून पुन्हा एकदा लाॅकडाऊनची घोषणा केली खरी, पण ही घोषणा पुणेकरांच्या मुळावर उठली आहे. आधीच पगार कपात, रोजगार नाही अशा स्थितीत भाजी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले गेल्याने दुकानदार मालामाल झाले, तर ग्राहकांचे खिसे रिकामे झाले. 

पुण्यात अजित पवारांनी लॉकडाऊन केलं अन् रोहित पवार म्हणतात...

रविवारी सकाळपासून भाजी विक्रेते, किराणा दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. पण भाजी विक्रेत्यांनी अक्षरशः ग्राहकांची पिळवणूक केली. टोमॅटो दर ६० रुपयांपासून ते १२० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. दोडका, कोबी, फ्लाॅवर, भेंडी, मिरची, गवार, आद्रक, लसूण यासाठी पाव किलोला २५ ते ३० रुपये मोजावे लागत होते. कांदा, बाटाटा यांनी ही चांगलाच भाव खाल्ला. पालेभाज्यांमध्ये पालक २५ ते ३० रुपये, मेथी ३० रुपये, कोथिंबीर ३० ते ४० रुपये असे दर होते. त्यामुळे ग्राहकांना भाजी खरेदी चांगलीच महागात पडली आहे. 

लॉकडाउनमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडणार; भाज्यांसह फळांच्या दरात...​

किराणा सामानात डाळ, तांदूळ, गहू यासह कोणतीही वस्तू घेण्यासाठी गेल्यावर प्रत्येकाचे दर २-३ रुपयांनी वाढलेले होते. भाव का वाढवले म्हणल्यावर "मार्केट बंद आहे, माल येत नाही, पुढचे काही दिवस दुकान बंद राहणार आहे,'' अशी कारणे सांगितली जात आहेत. मात्र पुढच्या १० दिवसात पुन्हा काहीच खरेदी करता येणार नसल्याने नागरिकांनी नाईलाजास्तव महाग वस्तू भरल्या. 

फक्त एकच चर्चा आता 'हा' नेता पुन्हा बसणार अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून...​

तुडूंब गर्दीत सुरक्षा हरवली
सर्वत्र अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू असली तरीही खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी कमी न झाल्याने रस्ते ही ओसंडून वाहत होते. विविध भागातील मंडई, रस्त्यावरील विक्रेते, किराणा दुकानात तुंडूब गर्दी होती. नागरिकांनी तोंडाला मास्क लावला असला तरी सोशल डिस्टन्स या गर्दीत हरवून गेला. त्यामुळे 'कोरोना'ची लागन होण्याचा धोका वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top