

Time-Saving Move: RTO’s Automated Vehicle Testing Centre from March 1
Sakal
-अविनाश ढगे
पिंपरी : मोशी येथील दहा एकर जागेत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) स्वयंचलित चाचणी केंद्र (ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर) उभारण्यात आले आहे. एक मार्चपासून ते कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या वाहनांच्या सर्व तपासण्या (पासिंग) स्वयंचलित यंत्रांद्वारे केवळ सहा मिनिटांत होणार आहेत. त्यामुळे वाहनांची अचूक तपासणी होण्यासह वेळेचीही बचत होणार आहे.