esakal | वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी!
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी!

- मालवाहतुकीच्या वाहनांना केंद्र शासनाने वाहतुकीस परवानगी.

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपलेली आहे, त्यांची वैधता आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत असेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवनह अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली आहे. केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार ही वैधता मुदतवाढ देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मालवाहतुकीच्या वाहनांना केंद्र शासनाने वाहतूकीस परवानगी दिली आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत वाहन मालकांना मोटार वाहन कायदा, 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 खालील कागदपत्रांच्या वैधतेचे नुतनीकरण करण्यास अडचणी येत आहेत. ज्या कागदपत्रांची  वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपलेली असेल म्हणजेच वाहनचालक अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती, वाहनाचा कोणताही परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व  वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या वैधतेची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
 
तसेच ज्या अर्जदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 32 व नियम 81 नुसार अर्जासाठी शुल्क जमा केले आहे, मात्र ती कामे लॉकडाऊनमुळे होऊ शकली नाहीत, असे शुल्क वैध समजण्यात येईल किंवा विलंबाने शुल्क भरले असल्यास त्यावर अतिरिक्त किंवा विलंब शुल्क आकारले जाणार नाही. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संबंधित वाहनधारकांनी वैधता नुतनीकरणासाठी कार्यालयात घाई किंवा गर्दी करु नये, परिवहन विभागाने वैधता नुतनीकरणासाठी अर्ज  करणे,  शुल्क भरणे व अपॉईंटमेंट घेणे या सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध केल्या आहेत, त्याचा सर्व संबंधितांनी लाभ घेऊन कार्यालयातील गर्दी टाळावी, असे आवाहन संजय धायगुडे यांनी केले आहे.  

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा