

Allegations of Fake Solar Light Installation in Velhe Budruk
Sakal
वेल्हे : किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे दहा लाख रुपये खर्चाचे दोन हायमास्ट सौर दिवे न बसविता बोगस कागदपत्रे व बोगस जियो टॅग फोटो व ग्रामसेवकांच्या खोट्या व बनावट सही शिक्क्यांचा वापर करीत दहा लाखांचे बिल ठेकेदाराने घेतले असल्याचा आरोप वेल्हे बुद्रुक च्या सरपंच सीता नंदकुमार खुळे व ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून त्या संदर्भात संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत चालु आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीत हद्दीत दोन सौर हायमास्ट दिवे उभारण्याच्या कामाला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने मंजूरी दिली.