

Contractor Installs Solar Tower After Fake Billing Report Exposed
Sakal
वेल्हे बुद्रुक : ग्रामपंचायतच्या हद्दीत दहा लाख रुपये खर्चाचे दोन हायमास्ट दिवे न बसविता दहा लाखाचे बिल घेतले ,याबाबत सर्वप्रथम बातमी सकाळ ऑनलाईन मध्ये गुरुवार (ता.०४) रोजी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे होत संबंधित ठेकेदाराकडून शुक्रवार (ता.०५) रोजी पहाटे येऊन एका हायमस्ट सौर दिव्याचे काम पूर्ण केले तर दुसऱ्या सौर दिवा बसवण्याचे काम रविवार (ता.०७) सात रोजी सायंकाळी उशिरापर्यंत चालू असल्याचे माहिती वेल्ह्याच्या सरपंच सीता खुळे व माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निखिल गायकवाड यांनी दिली .